मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील राजवाडा नावाच्या गावच्या सीमेवर असलेल्या मारूती मंदिरासमोर शिवाची पिंडी आणि नंदी आहे. महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. मात्र येथे जाताना भाविकांना एक सावधगिरी बाळगावी लागते. ते म्हणजे मोबाईलवर बोलत असाल तर तुमचे रोमिंग कधी सुरू होते याची कल्पनाच येत नाही.कारण येथे शिव पिंडीचा भाग मध्यप्रदेश राज्यात येतो आणि नंदी महाराष्ट्रात. पिंड आणि नंदी यामध्ये केवळ दोन पावलांचे अंतर आहे. त्यामुळे फोनवर बोलताना तुम्ही हे अंतर पार केलेत की रोमिंग सुरू होते.
महाराष्ट्राकडून मंदिरापर्यंत रस्ते बांधणी
राजवाडा फलिया गावाची ही कथा. येथील सरपंच सांगतात गावाचा ७५ टक्के भाग महाराष्ट्रात आहे व २५ टक्के मध्यप्रदेशात. महाराष्ट्राचा हा भाग शिरपूर ,धुळे जिल्हयात, दोंदवाडा ग्रामपंचायतीत येतो. मध्यप्रदेशाचा भाग बडवानी जिल्हयात राजवाडा नावानेच ओळखला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने येथे थेटपर्यंत डांबरी रस्ता आणि बस सेवा दिली आहे. म.प्रदेशात मात्र रस्ता कच्चा आणि येथे येण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.
येथील मारूती मंदिर खूप जुने आहे. मंदिर उभारताना सीमा नव्हती. महाराष्ट्राच्या हद्दीत 200-250 घरे येतात तर म.प्र. च्या हद्दीत 50-60 घरे आहेत. श्रावणातही येथे खूप गर्दी असते.
No comments:
Post a Comment